From Fedora Project Wiki

(Fudcon_Marathi_news)
(No difference)

Revision as of 05:49, 9 June 2015

फेडोरा कम्युनिटी चा FUDCon - २०१५ आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पुणे, महाराष्ट्र फेडोरा कम्युनिटी ही “Freedom, Friends, Features, First” या मुलभूत तत्वांवर आधारीत आहे आणि FUDCon हा कार्यक्रम देशातील वेगवेगळ्या फेडोरा डेव्हलपर्स आणि युजर्स ची परिषद असून तिथे नवनवीन टेक्नोलॉजीच्या माहितीवर देवाण घेवाण होते. यावर्षी FUDcon हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दि.२६ ते २८ जून २०१५ ला "महाराष्ट्र इंस्टीटूट ऑफ टेक्नोलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग (MIT COE) पुणे", इथे होत असून ह्या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. FUDCon हा कार्यक्रम इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा असून त्यात त्यांना ओपन सोर्स बद्दल माहिती आणि वेगवेगळ्या ओपन सोर्स कम्युनिटीमध्ये कसे सहभागी व्हावे करायचे यासाठी मार्गदर्शन मिळु शकेल जेणे करून त्यांना भविष्यात नौकरी त्याचा फायदा होऊ शकेल. FUDCon -२०१५ च्या कार्यक्रमात ३६ टेक्नोलोजीवर सखल माहिती आणि सोबत १३ प्रात्यक्षिके दिली जाणार असून यात स्टोरेज, क्लाउड, कंटेनर, कम्युनिटी, फेडोरा, कर्नल, डिझाईन, ॲन्ड्रॉइड आणि शैक्षणिक इत्यादींचा समावेश आहे.